पुणे

आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; पुणे विभागातून तब्बल ‘एवढ्या’ बसेस सोडणार

पुणे- आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आळंदी येथून पायी चालत पंढरपूरला जातात. परंतु ज्यांना पायी चालत जाणे शक्य नाही, अशा भक्तांसाठी जाता एसटी सुविधा करण्यात आली आहे. यंदा पुणे विभागातून वारीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी वारकऱ्यांना पंढरपूरला दर्शनासाठी जाताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पुणे विभागातील सर्व १४ आगारांतून जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागातून २७५ बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच बाहेरील आगारांतून २०० बसेस मागविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- पुणे महानगरपालिका मालामाल; मिळकतकरामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे उत्पन्न

आषाढी वारीसाठी एसटीमहामंडळ सज्ज झाले असून, १० जुलैपासून जादा गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १५ ते १९ जुलै या काळात चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. बसचे ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांकरिता स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांत आरक्षणाची सुविधा सुरू आहे.

वारीच्या काळात गत वर्षी नियोजन केलेल्या जादा गाड्यांव्यतरिक्त वारकऱ्यांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे यंदा एकूण ४७५ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही गाड्यांची मागणी वाढली, तर त्या पद्धतीने गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा- Police Bharti 2024: पुणे पोलीस भरतीसाठी २० हजार ३८२ अर्ज दाखल

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांचा व वारकऱ्यांचा ४० जणांचा व त्यापेक्षा जास्त जणांचा ग्रुप असेल, तर एसटी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांच्यासाठी एसटीकडून खास सोय करून ‘लाल परी’ दारापर्यंत येऊन उभी राहील.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये