बजेटच्या दोनच दिवसानंतर अमूलने दुधाचे दर वाढवले, आता इतक्या रुपयांना मिळणार दुध
Amul Milk Price Hiked : अर्थसंकल्प येऊन दोन दिवस उलटले असतानाच अमूल डेअरीने (Amul Dairy) आता मोठा धक्का दिला आहे. अमूलने देशभरातील बाजारात आपल्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व प्रकारच्या दुधावर ही दरवाढ केली आहे. वाढलेल्या किमती शुक्रवार, 3 फेब्रुवारीपासून लागू होतील.
अमूल कंपनी संबंधित अधिकार्यांच्या मते, आता बाजारात अमूल गोल्ड दुधाची किंमत प्रति 500 मिली 33 रुपये झाली आहे आणि त्याच्या एक लिटरच्या पिशवीची किंमत 66 रुपये आहे. लोकांना 500 मिली अमूल फ्रेश दुधासाठी 27 रुपये आणि एक लिटरच्या पाऊचसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच 500 मिली अमूल गायीच्या दुधाची किंमत आता 28 रुपये, तर अमूल गायीच्या दुधाची एक लिटर किंमत आता 56 रुपये झाली आहे. अमूल ए2 म्हशीच्या दुधाच्या 500 मिलीची किंमत 35 रुपये आणि अमूल ए2 म्हशीच्या दूध 1 लीटरची किंमत 70 रुपयांवर गेली आहे.