ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

Mumbai: मुंबई विमानतळावरून एकही विमान उडणार नाही, 6 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

मुंबई | Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 17 ऑक्टोबरला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) बंद राहणार आहे. हे विमानतळ 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सहा तास विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाहीये.

मुंबई विमानतळ हे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर विमानतळ ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी सहा तास विमानाचं उड्डाण होणार नाहीये.

विमानतळ ऑपरेटरने निवेदनात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा भाग म्हणून दोन्ही रनवे बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळावरील दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे उद्या सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहणार आहेत.

CSMIA नं सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्यानं देखभालीचं काम सुरळीतपणे पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. त्यामुळे CSMIA ला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे, असंही निवेदनात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये