क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड-दोन लाखांसाठी मुलांची विक्री; सहा जणांना अटक

मुंबई : (Mumbai Children Kidnapping) फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटूंबातील लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईच्या मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या सहा आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुंबईचा कुरार पोलिसांनी (Mumbai Police) ही कारवाई केली. या आरोपींनी मुंबईत किती लहान मुलांना पळवले आहे आणि या टोळीमध्ये आणखी किती सदस्य आहे या संदर्भात आता कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही टोळी मुलांची तस्करी करणाऱ्या एका बड्या रॅकेटचा भाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुले नसणाऱ्या नागरिकांना लहान मुले विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते. एक-दीड वर्षाच्या मुलासाठी खरेदीदाराकडून दीड ते दोन लाख रुपये या मुले चोरणाऱ्या टोळीला मिळतात अशी माहिती समोर आली आहे. इरफान फुरखान खान (26 वर्षे), सलाहुद्दीत नुरमोहम्मद सय्यद (23 वर्षे), आदिल शेख खान (19 वर्षे), तौफिर इक्बाल सय्यद (26 वर्षे), रझा अस्लम शेख (25 वर्षे) आणि समाधान जगताप अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.

इन्स्टाग्रामवरून (Instagram) ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी (Malvani Police) अटक केली आहे. सदरच्या आरोपीने या महिलेकडून सोनं आणि पैसेही उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच याशिवाय इतरही महिलांशी त्याचे संबंध असून त्यांनाही लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचं समोर आलं आहे. योगेश सुनील भानुशाली (33 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये