WPLमध्ये मुंबई इंडियन्स आघाडीवर! नव्या जर्सीचे केलं लाँचींग…

Mumbai Indians WPL : भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमधून सेमी फायनलमध्ये गाशा गुंडळून माघारी परतली. आता यानंतर सर्वांना ऐतिहासिक अशा पहिल्या महिला प्रीमियर लीगचे वेध सगळ्यांना लागले आहेत. यात मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बाजी मारली आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील महा मुकाबल्याने 4 मार्चला महिला प्रीमियर लीगचा नारळ फुटणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स ही पहिली फ्रेंचायजी ठरली जिने WPL साठी पहिल्यांदा आपल्या जर्सीचे अनावरण केले. मुंबई इंडियन्सचा संघ सरावासाठी एकत्र येणारा देखील पहिला संघ ठरला आहे. संघासोबत हरमनप्रीत कौर देखील लवकरच जोडली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने जर्सी अनावरणचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘सुपरहिरोज जे परिधान करतात ते.. आमची पहिली वहिली WPL जर्सी आम्हाला खूप आवडली.’ मुंबई इंडियन्सने WPL मध्ये देखील आपला निळा रंग सोडलेला नाही. याचबरोबर जर्सीमध्ये गोल्डन रंग देखील वापरण्यात आला आहे. याचबरोबर नवा नारंगी रंग देखील याच वापरण्यात आला आहे. त्यामुळे ही जर्सी पुरूषांच्या जर्सीपेक्षा वेगळी दिसते.
महिला आयपीएल WPL 2023 चा पहिला हंगाम हा राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. ही स्पर्धा जवळपास 3 आठवडे सुरू राहील. मुंबईच्या ब्रेबॉन आि डी. वाय. पाटील स्टेडियमवर हे सर्व सामने होतील. सामने भारतीय वेळानुसार दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 ला सुरू होतील.