पुणे : ‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स आणि फिल्म फेस्टिव्हल’ संस्थेच्या वतीने मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘वूंग – वूंग’ लघुपट प्रथम, ‘अनिता’ लघुपट द्वितीय आणि ‘सापशिडी’ लघुपटाने तृतीय क्रमांक पटकाविला, अशी माहिती मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी दिली. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन आगाशे, अभिनेत्री तेजा देवकर, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेता हंसराज जगताप, अभिषेक अवचार, दिग्दर्शक अमर देवकर, शंकर धोत्रे, दत्ता गुंड, जय भोसले आदी मान्यवर उपस्थित होती.
या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, ‘नाटक हे शब्दांचे तर चित्रपट हे दृक्श्राव्य माध्यम आहे. आजच्या तरुण पिढीचा मला सार्थ अभिमान असून त्यांच्यावर माझा शंभर नव्हे एक लाख टक्के विश्वास आहे. भारतीय चित्रपट तरुण पिढीच्या हातात पडल्यानंतर अजून तो गगनभरारी घेईल. चित्रपट मनोरंजन क्षेत्रामध्ये तरुणांना करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर करिअर म्हणून तरुणांनी बघावे.