प्रेमासाठी तरुणानं आयुष्य संपवलं; मुंबईच्या सी लिंकवरून तरुणाची आत्महत्या
मुंबई | वांद्रे वरळी सी लिंकवरुन (Bandra Worli Sea Link) 28 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या (Sucide) केल्याची माहिती समोर आली आहे. आकाश सिंह असं या तरुणांचं नाव असून तो एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याने वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आकाशचे त्याच्या मैत्रीणीसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सिंह असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश हा परळ येथील रहिवासी असून तो वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका बँकेत नोकरी करत होता. कामावरुन सुटल्यानंतर आकाशने घरी जाण्यासाठी टॅक्सी बूक केली. यानंतर त्याने चालकाला टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितले. पुलावरुन जात असताना आकाश फोनवर बोलत होता. वांद्रे-वरळी सी लिंकवर टॅक्सी आल्यानंतर त्याने चालकाला फोन बाहेर पडल्याचे सांगितले. यामुळे चालकानेही टॅक्सी थांबवली. यानंतर टॅक्सीतून बाहेर पडल्यानंतर कशाचाही विचार न करता समुद्रात उडी मारली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आकाशची शोधाशोध सुरु केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा आकशचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. प्राथमिक माहितीनुसार, आकाशचा तीन महिन्यापूर्वी ब्रेकअप झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.