क्राईमताज्या बातम्यामुंबई

शिवाजी पार्कमधील मरीन झूमधून सहा प्राण्यांची चोरी

मुंबई | दादरच्या शिवाजी पार्क (Dadar Shivaji Park Zoo) एरियामध्ये असलेले मरीन झू (zoo) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मरीन ॲक्वा झू मधून प्राण्यांची चोरी (animals stolen) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे अजगर, घोरपडी, पाल आणि सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणी संग्रहालय चर्चेत आलं होतं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात आहे.

प्राणी संग्रहालयाचे मालक कोण?

सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे. तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते. ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अॅन्ड झू अॅडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अश्या विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नंदकुमार मोघे यांचे घरचे संबंध होते. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य आणि राष्ट्रिय उद्याने तयार करण्यात बाळासाहेबांनी मोघे यांना प्रोत्साहन दिले होते. सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो. लोकांना अशा प्राण्यांबद्दल साक्षर करण्यासाठी आम्हीही संस्था चालवत असल्याचे त्या संग्रहालय चालकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये