इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

मुंबई पुन्हा निशाण्यावर? दहशतवादी संशयितांकडे सापडले चाबड हाऊसचे फोटो

मुंबई | Chabad House – मुंबई (Mumbai) पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जातंय. कारण दहशतवाद्यांकडे कुलाबा येथील चाबड हाऊसचे (Chabad House) फोटो सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांकडे फोटो सापडल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून चाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवाद्यांकडे चाबड हाऊसचे फोटो सापडले आहेत. दहशतवाद्यांकडे फोटो सापडल्यानंतर एटीएसनं सांगितलं की, चाबड हाऊसचे काही गुगल फोटो संशयितांकडे सापडले आहेत. त्यामुळे आता चाबड हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच अगोदरच चाबड हाऊसमध्ये उच्च सुरक्षा आहे. तर गुरूवारी बाहेरील भागात आणि मध्यभागी एक मॉक ड्रिल घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांकडे चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याचा कट रचल्याबद्दल दोन आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये