मोठा अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कारची ट्रकला जोरदार धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumabi – Pune Expressway) पुन्हा एकदा मोठा अपघात (Accident) झाला आहे. कारनं ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी उर्से टोलनाक्याजवळ कारनं ट्रकला मागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात अर्धी कार ट्रकखाली चिरडली गेली आहे. त्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून पुण्याकडे ही कार जात होती. त्यावेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला या कारनं मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अर्धी कार ट्रकखील चिरडली आणि कारमधील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसंच महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीनं ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.
दरम्यान, या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसंच आता शिरगाव पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.