क्राईमताज्या बातम्या

अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनिक्षाला पोलीस कोठडी

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Anishka Jaisinghani) हिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षाला पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे कोर्टात सुनावणीदरम्यान पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपांच्या खंडणीची मागणी केली होती, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनिक्षाच्या सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कोण आहे ‘अनिक्षा जयसिंघानी’ ?

अमृता फडणवीस यांना लाचेची ऑफर देणाऱ्या तरुणीचं नाव ‘अनिक्षा जयसिंघानी’ असं आहे. ती वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिक्षा ‘लॉ’ची पदवीधर आहे. तसंच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरची रहिवासी आहे.

अनिक्षा तिचे वडील अनिल सिंघानीया यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते रद्द करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होती. मात्र या सगळ्यामध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश असू शकतो, असा दावा पोलिसांनी कोर्टात केला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी कोर्टात अनिक्षा जयसिंघानीया हिची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या सगळ्या प्रकरणात येत्या काळात काय-काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये