अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेकडून खासजी कंपन्यांना आवाहन

पुणे : मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊसाने जोर धरलेला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आलेले आहेत. त्यामुळे हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील दिलेला आहे. पुण्यात देखील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील शाळांना पुढील तीन दिवसांसाठी सुट्टी देखील देण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पुण्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पुणे महानगर पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्यातील खासगी कंपन्यांनी शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करण्याचं आवाहन महापालिकेकडून कंपन्यांना केलं आहे.

पुणे महापालिकेने ट्वीट करून भारतीय हवामानशास्त्र विभागाने दोन दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून पुण्यातील खासगी आणि आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ला प्रोत्साहन देण्याच आवाहन केलं आहे.

Dnyaneshwar: