ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

अण्णा , आता बास !

मोहोळ यांच्या विरोधात होम पिचवर धुसफूस

अण्णा , आता बास ! तुम्हाला स्टॅंडिंग दिले , महापौर पद दिले ,सरचिटणीस पद दिले …. आता बास करा , तुम्हाला नक्की पाडणार ….. पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आघाडीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या होम पीच असलेल्या कोथरूडमध्येच ही बॅनरबाजी काल दिवसभर गाजत होती.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव सर्वात आघाडीवर असले तरी त्यांच्याविरुद्ध मतदारसंघांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून आले.

धुसफूस

सध्या भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कारणांवरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मोहोळ यांच्या उमेदवारीने तर याचे टोक गाठले.
कुठलीही चर्चा किंवा मागणी नसताना मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचे सदस्यत्व दिले गेले. ब्राम्हण मतदारांची नाराजी कमी करायची या भावनेने पक्षाने हा निर्णय घेतला . परंतु आत्ताच्या परिस्थितीनुसार ही समयसूचकता नव्हती असे बोलले जाते.

तावडे यांची भूमिका महत्त्वाची

पक्षाचे नेते विनोद तावडे यांचा हस्तक्षेप पुणे मतदार संघामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे . त्यांनीच माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याचे समजते. त्यामुळे देवधर यांचे नाव मागे पडले . त्याच देवधर हे सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेत नाहीत , अनेक सामाजिक कार्यकर्ते , जेष्ठ पत्रकार यांनाही टाळतात. हा संदेश नेमकेपणाने तावडे यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी राष्ट्रीय नेत्यांसमोर नवी मांडणी केली .
मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारी नंतर तर देवधर यांची उमेदवारी रद्द ठरल्याचेच संकेत मिळाले.

दादांचे कार्यकर्ते नाराज

चंद्रकांत पाटील यांचे समर्थक देखील पक्षांमध्ये चाललेल्या एकूण घडामोडींवरती फारसे खुश नाहीत. मोहोळ यांच्या उमेदवारीला चंद्रकांत दादांच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत विरोध असल्याचे समजते. शिवाय सगळीच महत्त्वाचे पदे कोथरूडमध्येच का ? अशीही प्रतिक्रिया आहे .
मुरलीधर मोहोळ यांचा मर्यादित संपर्क आणि हाय प्रोफाईल राहणीमान , सामान्य कामगार – कष्टकरी समाजाला अपील होत नसल्यामुळे येथे महाविकास आघाडीच्या वतीने जर रवींद्र धंगेकर रिंगणात उतरले तर भाजपाला फटका बसू शकतो असे सांगितले जाते.

दादांचे कार्यकर्ते नाराज

मुरलीधर मोहोळ यांना आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खूप पदे मिळाली . परंतु त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही . असा एक सूर मतदार संघात आहे . त्यावरूनच आज ‘ स्टॅंडिंग दिली , महापौर दिले , सरचिटणीस बनवलं. आता बास झालं ,तुला नक्की पाडणार…… कष्टाळू भाजप कार्यकर्ते ‘ असा उल्लेख असलेले बॅनर झळकविण्यात आले .
रवींद्र धंगेकर यांची जर उमेदवारी निश्चित असेल तर केवळ हाय प्रोफाईल चेहरा असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय धोक्यात आहे , असा स्पष्ट सूर कार्यकर्त्यांमधून दिसून येतो .
विशेषतः विरोधी पक्षांपेक्षा भाजप कार्यकर्तेच त्यांना आसमान दाखवतील , अशी चर्चा आहे.

पुन्हा रासने करू ….

कसबा विधानसभा पोट निवडणुकीवेळी देखील भाजप कार्यकर्त्यांचे फारसे न ऐकता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली . भाजप कार्यकर्त्यांनीच रासने यांना घरी बसविले. ‘ मोहोळ यांचा देखील रासने करणार ‘ अशी उद्विग्न प्रतिक्रिया अदखलपातर ठरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये