क्राईमताज्या बातम्यापुणे

येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड फरार; चकवा देत फिल्मी स्टाईलने पलायन

पुणे | खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव याने पोलिसांना चकवा देत तुरुंगातून पलायन केले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं जात आहे. (Ashish Jadhav escaped from Pune Yerawada Jail)

2008 साली वारजे पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आशिष जाधवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने 302 च्या आरोपाखाली त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

संवेदनशील अन् कडक सुरक्षा व्यवस्थेत काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये