पुणे : हवामानबदलाचा प्रभाव कमी करण्याचे आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने (एसएसपीयु) एनर्जी स्वराज्य फाउंडेशनबरोबर संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, असे एनर्जी स्वराज्य फाउंडेशनबरोबर करार करणारी एसएसपीयु ही भारतातील पहिलीच युनिव्हर्सिटी ठरली आहे. या समारंभास सिम्बायोसिसमधील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या समारंभाची सुरुवात डॉ. गौरी शिरूरकर (प्रभारी कुलगुरु, एसएसपीयु) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली आहे. तसेच डॉ. स्वाती मुजुमदार (प्र-कुलपती सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांनी कौशल्य आणि कौशल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. एस. बी. मुजुमदार, अध्यक्ष, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आणि अध्यक्ष (कुलपती, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांनी म्हटले, हवामानबदलासाठी मानवी स्वभाव प्रमुख कारण आहे. मानवाने एखाद्या गोष्टीची असणारी गरज आणि त्या गोष्टीबद्दल असणारी हाव यात फरक केला पाहिजे.
एनर्जी स्वराज्य फाउंडेशनचे डॉ. चेतनसिंग सोलंकी द सोलर मॅन ऑफ इंडिया याप्रसंगी म्हणाले, सध्याची पिढी ही हवामानबदलाचे परिणाम कमी करण्यासाठी पहिली आणि शेवटची पिढी असणार आहे आणि आपल्याकडे कालावधी खूप कमी उपलब्ध आहे. सिम्बायोसिसने एनर्जी स्वराज फाउंडेशनसह संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचे आणि मानवी समाजावर हवामानबदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी योग्यवेळी पाऊल उचलले आहे. संयुक्त सामंजस्य करारामध्ये सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व एनर्जी स्वराज फाउंडेशन यांनी जगावरील हवामानबदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यास संयुक्तपणे सहमती दर्शवली आहे.