गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का! मविआचे सुधाकर अडबाले विजयी
नागपूर : Nagpur MLC Election 2023 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) भाजपला (BJP) शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांनी याठिकाणी विजय मिळवला आहे. सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांच्या विजयाने देवेंद्र फडणवीसांची टाकत नागपूरमध्ये कमी पडली अशी चर्चा सुरु आहे.
नागपूर मतदार संघात भाजपचा विजय होणे निश्चित समजले जात असताना त्यांना मोठा धक्का बसलेला दिसत आहे. १२ वर्षांपासून येथून आमदार असलेल्या नागोराव गाणार (Nagorao ganar, Nagpur) यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सुधाकर अडबाले यांना १६७०० तर नागोराव गाणार यांना ८२११ एवढी मते मिळाली आहेत.