ताज्या बातम्यामनोरंजन

‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण; काय आहे नेमकं प्रकरण?

Nana Patekar Viral Video : ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखले जातात. नानांचा स्पष्टवक्तेपणा अनेकांना भावतो. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ समोर (Viral Video) आला आहे ज्यात नाना पाटेकरांनी एका मुलाला फटकवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ वाराणसी येथील दशाश्वमेध घाट येथील आहे. नाना त्यांच्या आगामी सिनेमाचं शुटींग करत असताना हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

त्यानंतर या प्रकरणावर स्पष्टीकरण देत नाना पाटेकर (Nana Patekar Viral Video) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टीकरण देत माफी मागताना दिसत आहेत. “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असे म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितले. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हते की हा मुलगा कोण आहे, मला वाटले आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारले आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळाले की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल” असे नाना म्हणाले.

https://x.com/ANI/status/1724968163564285997?s=20

नेमकं प्रकरण काय?

नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. चित्रिकरण सुरु असताना एक चाहता अचानक नाना यांच्या जवळ येतो आणि सेल्फीची विनंती करतो. चित्रिकरण सुरु असताना अचानक त्याला येताना पाहून नानांना राग अनावर होतो. ते रागाच्या भरात त्या चाहत्याच्या डोक्यावर फटका मारतात. त्यानंतर तो चाहता तेथून निघून जातो.

https://x.com/SAMTHEBESTEST_/status/1724682204230664695?s=20

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये