हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून नाना पटोले म्हणाले, “प्रभू श्रीरामांनंतर पदयात्रा काढणारे राहुल गांधी हे…”

मुंबई : (Nana patole On maharashtra BJP) मागील काही वर्षात भाजप सातत्यानं हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करुन काॅंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ते म्हणाले, देशात हिंदुत्त्वाचा गवगवा करणारे रथयात्रा काढतात. मात्र, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढली असून प्रभू श्रीराम यांच्यानंतर अशी पदयात्रा काढणारे राहुल गांधी हे देशाच्या इतिहासातील चौथी व्यक्ती असल्याचे म्हटलं आहे.
देशाचा तिरंगा सुरक्षित राहावा, आणि देशाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. यावरुन धर्माचे पालन कोण करते आहे हे दिसून येत आहे. भाजपावाले गाडीतून रथयात्रा काढतात, हे सर्व महाराजे बनले आहेत. देशाने आज एकत्र येणं ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या टीशर्टवरून केलेल्या येत होती, यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातलेल्या कोटची किंमत किती आहे याचे स्पष्टीकरण द्यावे असं म्हटलं आहे. चीनवरून मास्क, कचरा एकंदरितच चीनची चमचेगिरी करणारे आज सत्तेत बसले आहेत. त्यांना राहुल गांधीच्या टीशर्टबाबत काय मिरची झोंबली काय माहित नाही अशी खोचक टिका पटोलेंनी भाजप नेत्यांवर केली आहे.