ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“पंतप्रधानांच्या हस्ते गटाराचं उद्घाटन करावं, हे…”; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर नाना पटोलेंची जहरी टीका

मुंबई : (Nana Patole On PM Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खोचक टीका केली आहे.

दरम्यान पटोले म्हणाले, “पंतप्रधान उद्घाटन करत असेलेल्या कामांमध्ये काही गटारांची कामंही आहेत. हे पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं असून ते पंतप्रधान पदाला एकप्रकारे धक्का लावण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. नरेंद्र मोदी हे गेली आठ-नऊ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मुळात पंतप्रधानांनी महापालिकेच्या प्रचाराला यावं की ग्रामपंचायतील यावं, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण गटाराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करावं, हे मात्र पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

हे’ आहेत नाना पटोले यांचे मोदींवर आरोप पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याचं भूमीपूजन केलं होतं, त्याचं काय झालं? राज्यपाल असेल किंवा भाजपचे नेते सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. आज मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो आहे. गुजरात निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला द्यावीच लागतील, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे मोदी मुंबईला काय गिफ्ट देणार हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये