नाना पटोलेंचा भाजपला खोचक टोला; म्हणाले, दुसऱ्यांच्या खांद्यावर…

मुंबई : दोन दिवसांपासून राज्यात शिवसेनेचे दोन गट तयार झाले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काळ सुरतवरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवकसेनेचे काही आमदार अपक्ष नेते देखील गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील काँग्रेस आमदारांची मुंबई मध्ये बैठक बोलावली आहे. तसंच खासदार संजय राऊत यांनी बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप करत शिंदे गटाला आवाहन देखील केलं आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य करत एक मिम्स शेयर केला आहे.
या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत आपल्या फेसबूक अकाउंटवरून एक मीम शेअर केला असून त्यातून भारतीय जनता पार्टीला खोचक टोला लगावला आहे. त्या मीममध्ये “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चित्र वापरण्यात आली आहेत.
दरम्यान, फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंना गोळी मारताना दिसत आहेत. त्यावर नाना पटोलेंनी जोरदार टीका केली आहे. तसंच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे की, २४ तासात मुंबईत या आणि चर्चा करा महाविकास आघाडीतून आमही बाहेर पडायला तयार आहोत असं देखील राऊत म्हणाले.