नाणार रिफायनरी पाकिस्तानमध्ये ?
मुंबई | Nanar Refinery Project – कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) पाकिस्तानमध्ये (Pakistan) चालला, असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. यावर उद्धव ठाकरे बोलतील का? रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात नेण्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता का? असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. “मोदी सरकार रिफायनरी प्रकल्प भारतात आणू पाहत होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोकणात येणार होता. त्यामुळे कोकणातील मराठी तरुणांना रोजगार आणि गुंतवणूकीची संधी मिळणार होती.
पण, इतक्या टोकाचा विरोध करण्यात आला की, हा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला आहे. यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील लोक बोलतील का?” असे आव्हान शेलार यांनी दिले आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला कोकणवासीयांनी विरोध केला. त्यामुळे सर्व कोकणातील जनतेला त्यांना देशद्रोही म्हणायचे असेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. ते वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.