“अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी…”, सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
नांदेड | Supriya Sule – अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारसोबत गेल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसंच अजित पवार राज्य सरकारसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये (NCP) दोन गट पडले, एक अजित पवार गट तर दुसरा शरद पवार गट. तर अजितदादांनी सरकारसोबत युती केल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू होत्या. याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नांदेडमध्ये (Nanded) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत होणाऱ्या चर्चांवर भाष्य केलं. जर अजितदाद मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालेन, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तर सध्याची राजकीय स्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. पण मला आनंद आहे की, सध्याच्या युतीच्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसले आहेत, असंही सुळे म्हणाल्या.
पुढे सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना नावं ठेवावीत पण नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. हे ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जातं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. पण ते नांदेडला येत नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.