ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा, मी त्यांना…”; नारायण राणेंचा खोचक टोला

मुंबई – Narayan Rane In Mumbai : महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यावरच भर देताना दिसत आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात टीका टिपण्णी सुरु आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण यांनी राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. (Dasara Melava)

काल पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी दरसा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार. त्यांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे. मेळाव्यासाठी त्यांना मैदानही मिळणार, धनुष्यबाणही शिंदेना मिळणार आणि सगळंच मिळणार अशी प्रतिक्रिया दिली होती. आज माध्यमांशी बोलतानाही त्यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. ते मुंबईत माध्यमांसमोर बोलत होते.

“उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हाच संपलेलं आहे. उद्धव ठाकरे देशात आणि महाराष्ट्रात कुठेही नाहीयेत. फक्त मातोश्रीच्या आवारातच त्याचं अस्तित्व दिसतंय.” अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्याचबरोबर “उद्धव ठाकरे यांना चांगली भाषा वापरताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्ये नसली तर त्यांनी मला फोन करावा. माझ्याकडे चांगली वाक्ये आहेत.” असा निशानाही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे.

नाणार प्रकल्प कोकणातच होणार

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे कोकणात होऊ पाहणारा नाणार प्रकल्पही राज्याबाहेर जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहेत. त्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाणार होणारच आणि तोही कोकणातच होणार. यासाठी कोणाचाही विरोध चालू देणार नाही. त्यासाठी मंत्र्यांशी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. नाणार हातून जाणार नाही यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये