ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
“एकनाथ शिंदे सहन करताहेत तोपर्यंत ठीक, एक दिवस…”; नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई : (Narayan Rane On Uddhav Thackeray) केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर चहुबाजूंनी शाब्दिक हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी ठाकरेंसह खासदार संजय राऊत निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले, “एकनाथ शिंदे सहन करत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण एकनाथ शिंदेंना सांगेन एक दिवस असं करा, यांचं मातोश्रीवरच सुरक्षा कवच काढून घ्या. कोणीही काहीही न करता मातोश्रीत बेशुद्ध पडेल हा माणूस, एवढा घाबरट आहे.
सध्या दोन बाहेरचे आणि एक घरातला असे तीन मार्गदर्शक यांना टेकू लावून आहेत, त्यापुढे हे चालतात. संजय राऊत, शरद पवार आणि मातोश्रीवरचा एक. त्यामुळं आम्हाला जास्त बोलायला लावू नका, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.