“…ते कात्रण जपून ठेवलंय, राऊतांना पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार”, नारायण राणेंचा इशारा

सिंधुदुर्ग | Narayan Rane – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. “26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवलं आहे. संजय राऊतला (Sanjay Raut) पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार”, असा इशारा नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. ते सिंधुदुर्गातील (Sindhudurg) कणकवलीमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, “माझ्याकडे ते कात्रण आहे, वकिलाकडे मी पाठवून ठेवलंय. असं वाचून मी विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. हा माझा वाईट स्वभाव आहे. 26 डिसेंबर या दिवशीचं सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवलंय. संजय राऊतला मी सोडणार नाही. ती केस त्याच्यावर करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं. म्हणून रस्ता मोकळा करतोय त्याला परत जायला”, असा इशारा त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
26 डिसेंबरच्या सामानातील अग्रलेखात नेमकं काय लिहिलं होतं?
26 डिसेंबरचा अग्रलेख हा ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली प्रकाशित झाला होता. यामध्ये नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, “सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण ते श्रीमान फडणवीस करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते.”
2 Comments