क्राईमपुणे

विश्रांतवाडी परिसरातून एक कोटीचे अमली पदार्थ जप्त

पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ३ तरुणांना अटक केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयाचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये