आरोग्यताज्या बातम्यादेश - विदेश

उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाच्या सूचना; राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : (Narendra Modi meeting) कोरोना अजून संपलेला नाही हे पुन्हा सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे व इतर ठिकाणी दक्षता वाढवावी. राज्यांनी कोरोना आरोग्य निर्देश लागू करण्यासह जीनोम सिक्वेन्सिंग आणि चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, सर्वांनी मास्क आवर्जून वापरावा व ज्येष्ठ नागरिकांच्या बूस्टर (Buster) लसीकरणावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत दिल्या.

कोरोनाचे व्हेरियंटच्या बीएफ -७ या उप-व्हेरियंटचे चार रूग्ण गुजरातसह तीन राज्यांत आढळून आल्यावर देशभरात आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (Amit Shah) आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची उपस्थिती होती. बैठीकमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये