ताज्या बातम्यापुणे

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा!

पुणे | पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी कात्रज, एनडीए येथील मैदानांची पाहणी महायुतीकडून करण्यात आली. सभेबरोबरच पुण्यात वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे.

सभेसाठी कात्रज, एनडीए येथील मैदानांची पाहणी महायुतीकडून करण्यात आली. खडकवासल्यामध्येही जागेची चाचपणी करण्यात आली. मात्र, आता स्थळ बदलण्यात येत आहे. पुणे रेसकोर्स हे स्थळ हडपसर भागात बारामती, शिरूर आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघांच्या परिघावर आहे.

चोख सुरक्षा व्यवस्था

मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभमीवर पुणे पोलीसांतर्फे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी होणारी गर्दी पाहता या पहिली जागा बदलून ही सभा रेस कोर्सवर घेतली जाणार आहे.

कोण कोण उपस्थित राहणार

या सभेसाठी भाजप आणि महायुतीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या ठिकाणी मोदी यांच्या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये