ताज्या बातम्यारणधुमाळी

“ज्यांनी बाळासाहेबांना…”, बिहार दौऱ्यावरून नरेश म्हस्केंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई | शिवेसनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज (23 नोव्हेंबर) एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे. ही केवळ लाचारी आहे”, अशी टीका म्हस्केंनी केली आहे.

आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीवर नरेश म्हस्के म्हणाले, “तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्रात येऊन भेटायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटायला जातात. त्यावेळी हे लोक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. मात्र, आदित्य ठाकरे तर एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला चालले आहेत”, असा खोचक टोला म्हस्के यांनी लगावला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच या भेटीबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये