ताज्या बातम्यापुणे

श्री महालक्ष्मी मंदिरात नारीशक्ती नवरात्रोत्सव

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना झाली तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शना खाली होतील.

याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय असणार आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.

  • शुक्रवारी (दि.४) पहाटे ५ वाजता महिलांचे सामुहिक श्रीसूक्त पठण होणार आहे. यावेळी पारंपरिक वेशात ५ ते ७ हजार महिला सहभागी होणार आहेत. तर, सायंकाळी ५ वाजता पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम मंदिरात होईल. रात्री ८.३० वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा नाटयरुपात सादर होणार आहे.
  • शनिवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजता विविध नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा होईल.
  • रविवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता महिला न्यायाधिशांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८.३० वाजता देवी आणि श्रीकृष्णावर आधारित कथकली नृत्य सादरीकरण होणार आहे.
  • सोमवारी (दि.७) ललिता पंचमीच्या दिवशी दुपारी ४ वाजता पुणे महानगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचा-यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील लेखिका व कवयित्री यांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
  • मंगळवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता वंचित विशेष घटकातील मुलींचे कन्यापूजन हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थेतील मुलींचे कन्यापूजन होईल. तसेच रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण होणार आहे.
  • बुधवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता पुण्यातील शाळांतील शिक्षकांचा भोंडला होणार आहे.
  • गुरुवारी (दि.१०) सैन्यदलातील भारतीय जवानांच्या वीरमाता व वीरपत्नी आणि महिला लष्करी अधिका-यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.
  • शुक्रवारी (दि.११) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव सोहळा नारी तू नारायणी या कार्यक्रमात होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री ८.३० वाजता सामुहिक गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • दस-याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल. सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, तर रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे.

उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा देखील काढण्यात आला आहे. मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये