“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही”- सुप्रिया सुळे
बारामती | Supriya Sule – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 52 दिवसांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) बारामतीत दाखल झाल्या. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत अजित पवारांचे (Ajit Pawar) कार्यकर्ते दिसून आले, त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही, असं वक्तव्यही सुप्रिया सुळेंनी केलं.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या राष्ट्रवादीमध्ये विचारांचं अंतर निर्माण झालं आहे. पण यामध्ये पवार कुटुंबियांचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. आमच्यातील काही घटकाला वाटलं की त्यांनी वेगळ्या विचारांच्या घटकासोबत जावं आणि काहींचं याबाबत म्हणणं वेगळं आहे. त्यामुळे यामध्ये फक्त वैचारिक मतभेद आहेत आणि वैयक्तिक नाही.
आज राष्ट्रवादीमध्ये अंतर दिसत आहे पण पुढे काय हाईल याबाबत मी सांगू शकत नाही. तसंच अजित पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतात त्यामुळे ते लवकरच बारामतीत येतील, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.