ताज्या बातम्यापुणे

नवले पुलाजवळ अपघात; ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू

पुणे | पुण्यातील नवले पुलाजवळ अपघाताचे सत्र हे सुरूच असते. अशातच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेच्या उपचारापुर्वीचा मृत्यू झाला आहे.

दुचाकीस्वार पती आणि पत्नी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. ज्योत्स्ना सूर्यकांत वाघुले (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत वाघुले (वय ४६) जखमी झाले आहेत. या प्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये