ताज्या बातम्यारणधुमाळी

“हनुमान चालिसेच्या प्रभावामुळेच शिवसेनेचे 40 आमदार सोडून गेले”

मुंबई | Navneet Rana On Mahavikas Aghadi – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. तसंच आता नवीन सरकार देखील स्थापन झाले आहे. दरम्यान महाविकास आघाडीने हनुमान चालिसेचा विरोध केला होता. हनुमान चालिसेच्या प्रभावामुळेच शिवसेनेचे 40 आमदार सोडून गेले, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीचा त्याच दिवशी पराभव झाला ज्या दिवशी शिवसेनेचे 40 आमदार पक्ष सोडून गेले होते. मात्र, महाविकास आघाडीचे लोक आपला पराभव स्वीकारायला तयार नाहीत. आपले सरकार कोसळले यावर विश्वास ठेवायला तयार नाही.

बंड केलेले काही आमदार आमच्यासोबत आहेत. ते फुटणार आहेत. आज ते उपस्थित राहतील मात्र, मतदान करणार नाही, असं आजही काही आमदार म्हणत होते, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच हा सर्व प्रकार घडला, असंही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये