“मी तिथं गेलो नाही, याचं मला समाधान वाटतंय”; शरद पवार

पुणे : संसद भवनाच्या नवीन इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (PM Narendra Modi Inaugurated New Parliament) मात्र, या उद्घाटन समारंभाला अनेक विरोधी पक्षांनी उपस्थिती लावली नव्हती. नवीन इमारतीचे (New Parliament) उद्घाटन हे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपतींच्या (President Of India Draupadi Murmu) हस्ते व्हायला पाहिजे होते, मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होत आहे हे कारण देत विरोधकांनी उद्घाटनाला उपस्थिती नाकारली. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील होते. नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या संबंधितच पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
“सकाळी मी उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. जे कर्मकांड सुरू होतं त्याच्यावरून असं दिसतंय की पंडित नेहरू यांनी जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना मांडली पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बोलवायला पाहिजे होतं. त्यांच्या भाषणानंतर अधिवेशन सुरू होते. राज्यसभेचा मी सदस्य आहे. त्याचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता का काय असं वाटत आहे. मी त्या ठिकाणी गेलो नाही याच समाधान आहे. जुनी बिल्डिंगसोबत आमची बांधिलकी आहे. या बिल्डिंगची चर्चा काही मर्यादित लोकांसाठी होती का असा प्रश्न पडला आहे,” असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.