अजित पवार गटाची गोची? शरद पवार गटाचा मोठा दावा! “राष्ट्रवादी प्रकरणी EC ला कार्यवाहीच करता येत नाही”;
नवी दिल्ली : (NCP Crisis) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचे कामत म्हणाले. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ५ मुद्दे मांडले.
मनु सिंघवी म्हणाले, देवदत्त कामत यांनी सांगितले की विचित्र घटना घडत आहेत. १९९९ पासून एक पक्ष निर्माण केला, विस्तार झाला तो फक्त शरद पवार यांच्यामुळे. यांना सर्वांना सहमतीने अध्यक्ष स्विकारले. कधीही कोणताही आरोप २० वर्षात झाला नाही.
मात्र पहिल्यांदा २०२३ मध्ये आरोप लावण्यात आले की २०१८ मध्ये झालेली निवडणूक चुकीची होती. राष्ट्रीय स्तरावर २०२०,२०२१, २०२२ मध्ये झालेली निवडणूक चुकीची होती. राष्ट्रीय कार्यकारणी चुकीची आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी हा आरोप केला आहे. मात्र राष्ट्रीय कार्यकारणीला बोलवण्याची प्रक्रिया प्रफुल्ल पटेल यांच्या पत्राने झाली. त्यांची सही पत्रावर आहे. निवडणुका होतात तेव्हा शरद पवारांना अजित पवार अध्यक्ष मानत होते. त्यांना प्रमोट करत होते. शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत, मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल त्यांचे समर्थ करतो. असे अनेका कागदपत्रे निवडणूक आयोगाला १० वेळा दाखवण्यात आले असल्याचे सिंघवी म्हणाले.
मनु सिंघवी म्हणाले, ३० जून २०२३ ला पक्षात फुट पडली, पक्षाचे चिन्हाबात कुठलाही मुद्दा उपस्थित नाही होऊ शकत. कारण चिन्हाच्या बाबात आधीपासून वाद पाहीजे की खरी राष्ट्रवादी कुणाची?. ३० तारखेपूर्वी अजित पवार गटाने हा मुद्दा कधीच उपस्थित केला नाही. त्याचे पुरावे देखील आहेत. मात्र याचिका दाखल केली त्यावेळी कोणताच वाद देखील नव्हता. जर वाद नव्हता. तर पक्षा फुट पडल्याचा मुद्दा कुठून येतो. निवडणूक आयोगाला अधिकारक्षेत्र कसे मिळते. निवडणूक आयोग अनुच्छेद १५ अंतर्गत कार्यवाही सरु कशी करु शकते. जर की पूर्वीपासून कोणताही वाद नव्हता.
निवडणूक आयोगाने यापूर्वी अनेक निकाल दिले आहेत. अनुच्छेद १५ अंतर्गत पूर्वीपासून वाद पाहीजे. एक याचिका दाखल करुन कोणताही वाद निर्माण करता येत नाही. याच (अजित पवार गट) लोकांनी शरद पवार यांना अध्यक्ष नेमलं आहे. यानींच बैठका बोलावल्या आता हे आक्षेप घेत आहेत. आता ते अविश्वास असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे खोटं आम्ही महाराष्ट्रासमोर आणू, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.