ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिंदे गटानं उठाव केला नसता तर राष्ट्रवादी…”, गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Gulabrao Patil – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना राज्यात पाहायला मिळत आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यादरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठा दावा केला आहे.

“2019 साली राष्ट्रवादीनं भाजपबरोबर शपथ घेतली होती. कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते, तशीच ती सकाळ होती. शिंदे गटानं हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादीनं भाजपबरोबर सत्ता स्थापन केली असती”, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादीचे अधिवेशन झाल्यावर सरकार कोसळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यासंदर्भात गुलाबराव पाटील म्हणाले की, “सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आमदार फुटू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशी विधानं केली जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल”, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये