ताज्या बातम्या

पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

दिल्ली | राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, आज 70 लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार गटाला (Ajit Pawar) ठणकावलं. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत असाही टोला त्यांनी लगावला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता हे लोक म्हणत आहेत माझी निवड चुकीची आहे. कायद्याने सगळं होईल. चुकीच्या मार्गाने कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी काळजीचं कारण नाही. काही चिंता करण्याची गरज नाही. निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी दाखवला.

भाजपने वॉशिंग मशिन चिन्ह घ्यावं – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपवर टीका करताना म्हणाले की, आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना सोबत घेतलं. त्यामुळे भाजपने आता त्यांच्या पक्षाचं कमळ हे चिन्ह बदलावं आणि वॉशिंग मशिन घ्यावं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये