“आम्ही दर्ग्या वर गेलो की मुसलमान आणि…”; आव्हाडांनी डिलीट केलेल्या ‘त्या’ ट्वीटवर दिली प्रतिक्रिया म्हणाले, “तुम करो तो…”

मुंबई : (NCP’s Jitendra Awhad gives shares tweet and gives clarification on deleted tweet about Aurangazebs grave and Chandrashekhar Bawankule) राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे अजित पवारांबारोबारच (Ajit Pawar) मागील काही दिवसांपासून वादात सापडलेले दिसत आहेत. काही दिवसांपासून त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी “औरंगजेब जर एवढा हिंदू द्वेष्ठा आणि क्रूर असता तर, त्याने बहादूर गडावरचे विष्णूचे मंदिर देखील तोडले असते.” असं वक्तव्य केलेलं आहे. त्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांना औरंगजेबाचा फार पुळका आहे. ते हिंदूद्वेष्ठे आहेत. अशा प्रतिक्रिया विरोधकांनी दिल्या आहेत. (ajit pawar and jitendra awhads controvercial statements and chhatrapati sambhaji maharaj, maharashtra politics)
या सगळ्या वादाच्या दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं होतं. मात्र, काहीच वेळात ते डिलीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये “औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळे, असा मथळा लिहिलेला होता. दरम्यान, ट्वीट डिलीट केल्यानंतर अनेकांनी त्यांना धारेवर धरले होते. मात्र, त्यावरही त्यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. खोटं बोलून कशाप्रकारे खेळ खेळता येतात हे दाखवण्यासाठी मी असं केलं होत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
काय लिहिलंय नवीन ट्वीटमध्ये ?
“आम्ही दर्ग्या वर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे मग जीतुदिन… मग हा हिंदु द्वेष्टा… मग टाकायचे घाणेरडे फोटो घाणेरड्या पोस्ट… औरंगजेबजी वरुण किती धावपळ… आम्ही बोलो असतो तर बाप रे बाप… मला माहीत आहे ती संतांची मझार आहे… पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते.”
“जो तुम करते हो वो हम भी कर सकते हैं… लेकीन हम करते नही है… तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, दो उडतें तीर से इतने घायल, कभी मीलोगे तो हमारे जखमो के अनगीनत निशान देख लेना.” असा मायना असलेले दोन ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केले आहेत.