अर्थइतरताज्या बातम्या

शेअर बाजारातून Big News! निफ्टीने केला मोठा टप्पा पार, शेअर्समध्येही मोठी खरेदी

मुंबई | Share Market Closing – भारतीय शेअर बाजार (Share Market) आठवड्याच्या पहिल्याची दिवशी मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. निफ्टीने मोठा टप्पा पार केला आहे. तसंच शेअर्समध्येही मोठी खरेदी दिसून आली आहे. सेन्सेक्सनं 65,000 चा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आज झालेल्या व्यवहारात एफएमसीजी, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसू आली.

आठवड्याच्या सुरूवातीलाच मिड कॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. आज राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 83 अंकांच्या उसळीसह 19,393 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर BSE सेन्सेक्स व्यवहाराअंती 267 अंकांच्या वाढीसह 65,216 वर बंद झाला.

एफएमसीजी, आयटी आणि बँकिंग शेअर्ससोबतच आजच्या व्यवहारात इन्फ्रा, ऊर्जा, हेल्थकेअर, धातू या क्षेत्रातील शेअर्सचीही खरेदी झाली. पण वायू, मीडिया आणि तेल यांचे शेअर्स घसरले. तसंच सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स हे मोठ्या वाढीसह बंद झाले. तर 5 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले असून 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह बंद झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये