क्रीडादेश - विदेश
निखात झरीन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये; मैदान गाजवण्याची मोठी संधी

नवी दिल्ली : भारतीची महिला बॉक्सर माजी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियन निखात झरीनने आत महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे. इस्तांबूलमध्ये झालेल्या सामन्यात ब्राझीलच्या कॅरोलिन डे अल्मैडाचा पराभव करून ती फायनल ला पोहोचली आहे. तिने हा सामना 5-0 असा एकतर्फी जिंकला आहे.

या स्पर्धेत भारताने 2006 मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने आठ पदकांची कामाई केली होती. यात चार सुवर्ण आणि एक रौप्य तर तीन कांस्य पदकांचा समावेश होता. आत्तापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मेरी कोम (सहा वेळा विजेती), सरिता देवी, जेनी आरएळ आणि लेखा सी या भारतीय बॉक्सर आहेत. यांच्या यादीत जागा मिळवण्याची झरीनला संधी आहे.