ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आपल्या पोरा-पोरींसाठी तिकीटं मागू नका”, केंद्रीय मंत्र्यानी टोचले भाजप नेत्यांचे कान!

नागपूर : (Nitiin Gadkari On BJP Leader) आपला पक्ष हा आई मुलाचा पक्ष नाहीय, भाजप पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षातील आमदार-खासदारांनी लक्षात ठेवा, आपल्या पोरा-पोरींसाठी तिकीटं मागू नका. जरी कुणी मागितलीच तर त्यासाठी माझा ठाम विरोध असेन. जनतेने तुमच्या मुलांसाठी तिकीटं मागितली पाहिजे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केलेल्या भाषणात गडकरींनी तुफान फटकेबाजी केली. बावनकुळेंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली तर उपस्थित नेत्यांचे देखील त्यांनी कान टोचले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्त्वाला वाव मिळणार आहे. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने-कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये