“जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसंच शरद पवार…”, नितीन गडकरींचा खोचक टोला
नागपूर | Nitin Gadkari – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये भाजपच्या ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली.
शरद पवार यांच्यावर टीका करताना नितीन गडकरी म्हणाले की, जशी जपानी गुडिया प्रत्येकाकडे बघून डोळा मारत असते तसंच काहीसं शरद पवारांचं आहे. कामाला लागा, असं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत असं कार्यकर्त्याला वाटत असतं. पण यानंतर तिकीट हे भलत्यालाच मिळतं.
‘थिंक फॉर द बेस्ट अॅण्ड प्रीपेअर फॉर द वर्स्टट’ आपण आपलं काम नेहमी व्यवस्थित करावं. कारण मिळालं तर बोनसही नाही आणि दु:खही नाही. पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्यायही नसतो, अशी मिश्किल टिपण्णी नितीन गडकरींनी केली आहे.