ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पुणेकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; शहरात बसेस धावणार नॉनस्टॉप

पुणे | Pune News – शहरात पुणेकर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना मोठ्या प्रमाणात दिसतात. तर आता पुण्यात (Pune) मेट्रो सुरू झाली असून तिला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामध्ये पीएमपीएमएलचे (PMPML) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन प्रताप सिंह यांनी बस सेवेत अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता पुण्यात 200 मार्गांवर नॉन-स्टॉप बसेस धावणार आहेत. विशेष म्हणजे या बसेसमध्ये कंडक्टर नसणार आहे. यापूर्वी अशा बसेसची दोन मार्गांवर प्रायोगिक पातळीवर अंमलबजावणी झाली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता शहरातील 200 मार्गांवर नॉन-स्टॉप बसेस सुरू केल्या जाणार आहेत.

शहरातील बसेस आता नॉन-स्टॉप धावणार असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनानं बस सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 200 मार्गांवर धावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये