“…त्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट”, बॉलीवूड पीआरबाबत नोरा फतेहीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | Nora Fatehi – बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या डान्स आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. नोराचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर आता नोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण नोरानं एका मुलाखतीत बॉलीवूड पीआरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
नोरा फतेहीनं झूम डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तुला पीआरसाठी काही लोकांना डेट करावं लागेल, असा मला अनेकांनी सल्ला दिला होता. ते सांगायचे की बॉलीवूड पीआर म्हणून प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट कर, पण मी कोणाचंही ऐकलं नाही. मला जे योग्य वाटलं तो निर्णय मी घेतला याचा मला आनंद आहे.
मला कोणत्याही व्यक्तीमुळे किंवा कोणत्याही विशिष्ट अभिनेत्यामुळे यश मिळालेलं नाही. मी नेहमी माझ्या मनाचं ऐकलं त्यामुळे आज मला स्वत:च्या मनाप्रमाणे काम करता येतंय, असंही नोरानं सांगितलं. नोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.