ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी
‘…सामान्य जनतेबद्दल चकार शब्द नाही’; अभिनेता संदीप पाठकची खंत

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. तसंच मागच्या काही दिवसांपासून मराठी कलाकार महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. ज्यात आता अभिनेता संदीप पाठक याचीही भर पडली आहे. संदीप पाठकनं महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबाबत केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.
संदीप पाठकनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं आहे, ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ संदीप पाठकनं केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.