मंडई मेट्रो नाही महात्मा फुले मंडई मेट्रो असे नाव देणे बाबत माळी महासंघाचे आंदोलन
पिंपरी ते स्वारगेट दरम्यान असलेले महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्थानकास ” मंडई मेट्रो” नाव देऊन मेट्रो ने महात्मा फुले यांचे नाव हटवले आहे हा थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या अपमान आहे याचा निषेध करण्या साठी आणि पूर्ण ” महात्मा फुले मंडई मेट्रो” नाव देण्याची मागणी साठी ” माळी महासंघा” आज महात्मा फुले मंडई येथे जोरदार आंदोलन करण्यात आले . यावेळी मेट्रो प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाची दखल घेत मेट्रो प्रशासनाने याचा तातडीने निर्णय घेत असल्याचे पत्र दिले , येत्या 4 ऑक्टोबर ला याबाबत बैठक होणार असून त्यात नामकरणाचा निर्णय घेतला जाईल असे नमूद केले आहे.
पत्र मिळाले जरी असले तरी पूर्ण नाव जो पर्यंत लावले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील असे आम्ही त्यांना कळविले आहे .
यावेळी आंदोलनात माळी महाससंघ सोबत ज्योती मंडळ , महात्मा फुले मंडळ, महात्मा फुले मंडई मधील व्यापारी त्याच बरोबर मनसे, राष्ट्रवादी दोन्ही , भाजपा,काँग्रेस चे पदाधिकारी ही उपस्थित होते .तसेच या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कसब्याचे आमदार श्री रवींद्र धंगेकर ही आले होते.
या प्रसंगी माळी महासंघाचे शहर अध्यक्ष श्री दीपक जगताप, श्री मृणाल ढोले पाटील,सौ स्मिता लडकत, बाळासाहेब लडकत, रवि सहाणे, हरिष लडकत, सतीश गायकवाड,मधुकर राऊत, सुधीर पैठणकर,राजेंद्र लडकत,सचिन शिवरकर,दुर्गेश नवले, सोमनाथ बटवाल,संतोष बनकर,विजय कोठावळे, हरिष जाधव ,बबलू बोंधे ,राकेश नामेकर , रीमा लडकत, शारदा लडकत,आरती सहाणे,प्रीती म्हेत्रे, गौरी पिंगळे, शांता नेवसे,शारदा फरांदे , वंदना बनकर,सीमा शिवरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
One Comment