इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भारताच्या संपर्कात; दूतावासाचा मदतीने मायदेशी परतणार
जेरुसलेम | सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्राइलमध्ये (IsraelPalestineConflict) घमासान युद्ध सुरु आहे. अशातच बॉलिवूडमधूनही अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्राइलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. ती हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती. नुसरत भरुचाशी शनिवारी दुपारी12:30 वाजता शेवटचा संपर्क करण्यात आला होता. ती त्याठिकाणी एका बेसमेंटमध्ये असून सुरक्षित असल्याचे समजले होते. मात्र, आता तिच्याविषयी एक चांगली माहिती समोर आली आहे. नुसरत सुखरुप असून लवकरच ती मायदेशी परतणार आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत नुकताच संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे. इतकंच नाही तर भारतात परत येण्यासाठी ती एअरपोर्टवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये नुसरत लवकरच मायदेशी सुखरुपपणे पोहोचणार आहेमात्रजोपर्यंत नुसरत सुखरुपरित्या घरी येत नाही तोपर्यंत तिचे कुटुंबीय, चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.