Nz Vs Ind : सामना सुरु होण्यापुर्वीच, पावसाच्या तुफान बॅंटींगमुळे सामना रद्द करण्याची नामुष्की!

माऊंट माऊनगनुई : (NZ Vs Ind T-20 Series 2022 1 St Match Cancel) न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली भारताची युवा टी 20 टीम आजपासून तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. संघातील युवा खेळाडूंसह भविष्यातील टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतोय हे पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र पहिल्याच टी 20 सामन्यावर वरूणराजाने वक्रदृष्टी टाकल्याने सामन्या रद्द करण्याची वेळ निर्माण झाली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंकडे आपला प्रतिभा दाखवून देण्याची नामी संधी आहे. मात्र पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांची देखील निराशा झाली. जर पावसामुळे सामने रद्द झाले नाहीत तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाची देखील खरी परीक्षा न्यूझीलंड दौऱ्यावर होणार आहे.