ताज्या बातम्यापुणे

जळत्या सरणावरुन वृद्धेचा अर्धवट जळालेला मृतदेह फेकला; धक्कादायक कारण समोर

पुणे | भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालवाडी गावात स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. जळत्या सरणावरचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

अंत्यविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर, नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे नावाच्या व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जाऊन महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हा प्रकार केला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळलं.

या घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेमुळे मृतदेहाची हेळसांड झाली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं कामं सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये