क्रीडाताज्या बातम्या

ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची धमाकेदार कामगिरी; मोडला राष्ट्रीय विक्रम

फिनलँड | Neeraj Chopra – ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास रचला आहे. तसंच नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. नीरजने फीनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये हा विक्रम केला आहे. नीरजने या स्पर्धेत 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली आहे. नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षाही सरस ठरली आहे. मात्र, नीरजला या स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 

ऑलिम्पिकनंतर जवळपास १० महिन्यांनतर नीरज चोप्रा एका स्पर्धेत सहभागी झाला. ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेत त्याने आपल्या पहिल्या प्रयत्नात ८६.९२ मीटर थ्रो केला. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मी थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात 85.85 मीटर इतकाच थ्रो फेकता आला.

दरम्यान, फिनलँडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने 88.02 मीटर आणि 80.36 मीटर अशी कामगिरी नोंदवली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये